google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

फडणवीसांनी केला उदासी महाराज मठात अभिषेक

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे दर्शन घेवून पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेकही करण्यात आला.
       यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ. शिवाजीराव कर्डीले, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.
   
        तत्पूर्वी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले.  जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तर शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूरमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!