google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवाशात 86 हजार रुपयांची दारू जप्त

नेवासा पोलिसांनी केली कारवाई; दोघे ताब्यात

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईमध्ये नेवासा पोलिसांनी 86 हजार रुपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त केला. या सदर्भात दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
         याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना शुक्रवार (दि. 21) रोजी गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय खबर मिळाली की, दोन इसम बजाज कंपनीच्या पल्सर मोटर सायकलवर मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी बेकायदेशीर दारू घेऊन जात आहेत.
           या माहितीवरून तातडीने पोलीस हवालदार किरण गायकवाड व पोलीस नाईक भानुदास काळोखे यांना सदरची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असता किरण गायकवाड, भानुदास काळोखे व ज्ञानेश्वर रसाळ यांनी तातडीने अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथे नाकाबंदी सुरू केली. त्यावेळी गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार दोन्ही इसम एका पल्सर मोटर सायकलवर आले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता पळून जाऊ लागले. त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ते पल्सर मोटर सायकलवर मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारू घेऊन जात असल्याचे दिसून आले. दोघांना त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी शुभम संजय यादव व सौरभ संजय साळवे दोन्ही रा. भेंडा ता. नेवासा असे सांगितले. सदरची देशी-विदेशी अवैध दारू दोन पंचांसमक्ष पंचनामा करून जप्त केली. 
          यामध्ये टूबर्ग कंपनीच्या बियर तसेच आयकॉन, मॅकडॉल, रॉयल चॅलेंज, ओल्डमाँक, इम्पेरियल ब्ल्यू, ऑफिसर चॉईस, गोवा टू इन वन इत्यादी तब्बल 86 हजार रुपयांची देशी-विदेशी ब्रँड जप्त केले. 
       सदर बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे दोन्ही आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राठोड पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत.
अवैध धंद्यांवर या पुढेही कठोर कारवाईचे धोरण अवलंबले जाईल. धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक नेवासा.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!