क्रिडा व मनोरंजन
विद्यार्थ्यांची सायकल चालवून शहिदांना श्रद्धांजली
ओम साई रायडर ग्रुप व नेवासा मुले शाळेचा अनोखा उपक्रम; दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत नेवासा ते श्री क्षेत्र देवगड येथे चौथीच्या विद्यार्थ्यांचा सायकल प्रवास; वर्गशिक्षक आण्णासाहेब शिंदेंचा सायकल सवारीतून क्षेत्र भेटीचा उपक्रम
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुले मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी नेवासा ते श्री क्षेत्र देवगड येथे 35 किमीचा सायकल प्रवास करत मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी झालेल्या निरापराध नागरिक व शहिदांना सायकल प्रवासाद्वारे एक अनोख्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण केली.
नेवासा : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुले मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी नेवासा ते श्री क्षेत्र देवगड येथे 35 किमीचा सायकल प्रवास करत मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी झालेल्या निरापराध नागरिक व शहिदांना सायकल प्रवासाद्वारे एक अनोख्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण केली.
ओम साई नेवासा तालुका सायकल रायडर्स ग्रुप व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीची सुरुवात शाळेच्या प्रांगणात हिरवा झेंडा दाखवून झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या रॅलीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा स्मिता अंबिलवादे व मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे यांनी हिरवा झेंडा फडकवत प्रारंभ केला. विद्यार्थ्यांसमवेत सायकल चालवत रॅलीचे नेतृत्व वर्गशिक्षक अण्णासाहेब शिंदे यांनी केले. यावेळी सायकल स्वारांना शाळेतील सर्व शिक्षक वृंद व पालक बालाजी मलदोडे, शाम राठोड, सलीम देशमुख, पेंटर विजय सुरोशे, किरण आंबिलवादे, गणेश सुरडे, श्रीकर मिटकरे, संदीप लोखंडे, अफरोज सय्यद आदि पालकांनी यावेळी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

ओम साई रायडर ग्रुपने नेवासा फाट्यावरून आरंभ करत यामध्ये गणेश माटे, हेमंत शेवाळे, संस्कार योगा ग्रुपच्या सदस्या सुचिता अंबुले, संस्कृती माटे, उत्कर्ष माटे, अर्णव माटे, आर्या गोसावी, प्रथमेश शेवाळे, श्रेयश राठोड, शिक्षक सतीश लांडगे, बाजीराव राठोड आदि सहभागी झाले होते. दोन्ही ग्रुपच्या वतीने प्रवरा नदीच्या काठावर मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या निरपराध नागरिक, पोलीस व जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी दिलेल्या ‘शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र देवगड येथील विविध मंदिरे, नव्याने झालेले प्रवेशद्वार, प्रवरा नदी, परिसरातील शेती व्यवसाय यांना भेटी देत क्षेत्रभेटीतून माहिती जाणून घेतली.
26/11 हल्ल्यातील शहिदांना शाळेच्या वतीने नेवासा ते श्री क्षेत्र देवगड पर्यंत माझ्यासह विद्यार्थ्यांनी सायकल चालवून श्रद्धांजली अर्पण केली. मोबाईल गॅजेट्सच्या युगात मुलांचा शारीरिक विकास साधावा या उद्देशाने व सायकल चालवण्याचे शरीराला होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. आण्णासाहेब शिंदे, वर्गशिक्षक
शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेवासा ते देवगड प्रवास माझ्यासह वर्गमित्रांनी सायकलने केला. इतक्या लांब सायकल प्रवासाचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला. क्षेत्रभेटीतून मला देवगड परिसरातील मंदिरे, नदी व शेती व्यवसायाची माहिती मिळाली. सर्वांच्या सोबत सायकलने प्रवास करताना खूप मजा आली. –शौर्य राहुल आठरे विद्यार्थी गटप्रमुख, इयत्ता चौथी.