google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

महिला जागृती मेळावा संपन्न

समाज विकास समिती, नेवासा यांच्याकडून जागतिक महिला दिन साजरा

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा :  समाज विकास समिती, नेवासा यांच्याकडून हंडीनिमगाव येथे या ठिकाणी मंगळवार (दि.5) रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष ब्रम्हकुमारी संस्थेच्या संचालिका वंदना दीदी व भरोसा सेल, अहमदनगरचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव उपस्थित होते. ‘शांती निकेतन संस्थेचे संस्थापक’ व स्वास्थ्य दर्पण प्रतिष्ठानचे राज्य प्रशिक्षक डॉ. प्रशांत शिंदे, नेवासा प्रांत सहाय्यक फादर जॉन गुलदेवकर, सेंट जोसेफ स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर फ्लोरा, सिस्टर हेविना, ब्रम्हकुमारी समृद्धी दीदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
             कार्यक्रमाची सुरुवात समाज विकास समितीच्या कर्मचाऱ्यांनी सन 2024 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम व प्रस्तावना मांडून केली. समाज विकास समितीचे संचालिका सिस्टर बिंदू यांनी सन 2023-24 चा वार्षिक अहवाल सादर केला. ज्ञानमाता हॉस्टेलच्या मुली व बचत गटातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यात जास्तीत जास्त महिलांनी त्यात सहभाग घेतला.
             कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रशांत शिंदे यांनी बचत गटाची संकल्पना स्पष्ट करून आदर्श गटासाठी महिलांना मार्गदर्शन केले. त्यात नियमित बैठक, नियमित बचत, नियमित कर्ज, नियमित परतफेड, नियमित हिशोब, आरोग्याविषयी चर्चा, शिक्षणाविषयी चर्चा, रोजगार व उपजिविकेविषयी चर्चा यांचा समावेश होता. या गोष्टींचे पालन केल्यास प्रत्येक महिला व गटाचा सर्वांगीण विकास होईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे गटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन केले. 
             अहमदनगर भरोसा सेलचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी महिलांच्या शिक्षणाचे महत्व व महिला अत्याचाराविषयी मार्गदर्शन केले. त्यात आजच्या काळात महिलांना शिक्षणाची गरज व शिक्षित झाल्यास त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाल्यावर लढा देऊ शकतील व त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल, असे त्यांने सांगितले.
             कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदना दीदी यांनी कौटुंबिक नातेसंबंध व सकारात्मक ऊर्जा याविषयी महिलांना मार्गदर्शन केले. चांगली व्यक्ती होण्यासाठी सकारात्मक विचार करणे व ते आचरणात आणण्याचे महत्व महिलांना सांगितले. महिलांवर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते, त्यामुळे महिलांचे विचार सकारात्मक असल्यास त्यांचे कुटुंबही त्याच मार्गाने चालेल, जेणेकरून आयुष्यात शांती व समाधान येईल व सर्व सुखी राहतील याविषयी महिलांचे मार्गदर्शन केले. फादर जॉन गुलदेवकर यांनी महिलांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले. 
           समाज विकास समितीच्या संचालिका सिस्टर बिंदू यांनी ‘आदर्श बचत गट 2024’ साठी मंगळापुर येथील रमाई बचत गटाची निवड केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रम्हकुमारी वंदना दीदी यांनी ट्रॉफी व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. मार्च महिन्यात समाजसेवा व समाजसेवक दिवस असल्यानिमित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
          फादर जॉन गुलदेवकर व सिस्टर फ्लोरा यांनी बक्षिस वितरण सोहळ्यात महिलांना बक्षिस देऊन सन्मानित केले. सर्व उपस्थित पाहुणे व महिलांना प्रीती भोजन देण्यात आले. कार्यक्रमात बचत गटाच्या मनीषा वाघमारे, शितल नरवडे, मनीषा आवारे, वैशाली झिंजुर्डे, मनीषा हिवाळे, गायत्री कोलते, संध्या साळवेसह तीनशे पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.
         
           कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालिका सिस्टर बिंदूसह विकास साळवे, सुनील साळवे, पल्लवी तुपे व धनश्री आवारे यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!