google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

‘सेंट मेरीज’ येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

’शब्दगंध’ वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन; विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रम सादर

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : येथील सेंट मेरीज शाळेत आज जागतिक मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे या हेतूने विद्यालयात या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
             कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी प्रा. किशोर धनवटे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की साहित्य हसायला शिकवते. वाचनाने विचार प्रगल्भ होतात. वाचन ही चळवळ झाली पाहिजे. वाचनाने संवाद कौशल्य वाढते. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता पुस्तकांना मित्र बनवले पाहिजे. वाचनाने व्यक्तिमत्व घडते. यासाठी आपण वाचनाला प्रवृत्त झाले पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये मराठी विषयाचे शिक्षक विजय लोंढे यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व विशद केले.
         
           यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम साजरे केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याची ओळख, कुसुमाग्रज यांचा परिचय, मराठी साहित्यिकांची माहिती तसेच काव्य वाचन व काव्य गायनाचे सादरीकरण केले. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोसी, व्यवस्थापक सिस्टर मारिया, सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता उपस्थित होत्या. 
           कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुशीला लोंढे, रेश्मा लोखंडे, योगिनी बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण क्षीरसागर, अक्षदा सुकाळकर, सायली लंघे, अनुष्का कांडेकर, सुर्यजीत देशमुख यांनी कार्यक्रम सादर केले.
       या कार्यक्रमप्रसंगी विद्यालय प्रांगणात ’शब्दगंध साहित्य परिषद’ फिरते वाचनालयाच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. निरनिराळ्या विषयावरील विविध पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सरोदे तर आभार प्रदर्शन  संगीता पातारे यांनी केले. राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!