google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरी

दिव्यांगांसाठी मोफत ई-रिक्षा वाटप योजना

मिळणार 3.75 लाखांचे कमाल अनुदान; अर्ज करण्याचे दिव्यांग महामंडळाचे आवाहन

                                         स्वराज न्यूज नेटवर्क 
अहिल्यानगर : दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्यादृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हीईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्ती खालीलपैकी कोणतीही एक ई-रिक्षा व्यवसाय श्रेणी निवडू शकतात.
🚙 E-Rickshaw for Passenger (प्रवाशासाठी)
🚙 E-Card for Cargo (मालवाहतुकीसाठी)
🚙E-card for Fruits and Vegetables  (फळे भाजीपाला विक्री)
🚙 E-Card for ICE Cream (आईस्क्रीम विक्री)
योजनेच्या अटी व शर्ती
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
अर्जदाराकडे किमान ४०% दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असावे.
अर्जदाराकडे UDID प्रमाणपत्र कार्ड असावे.
वार्षिक उत्पन २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांग्त्व असलेल्या प्राधान्य असेल. त्यामुळे निवडीचा क्रम अतित्रीव्र दिव्यांग ते कमी दिव्यांग राहील.
अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडले/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
उमेदवार वयोमर्यादा १८ ते ५५ च्या दरम्यान असावे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
(१) लाभार्थी आधार कार्ड
(२) पासपोर्ट फोटो आणि सही
(३) विकलांग प्रमाणपत्र (असल्यास)
(४) ई-मेल आय डी (असल्यास)
(५) शैक्षणिक कागदपत्रे (असल्यास)
(६) Domacile Certificate/अधिवास प्रमाणपत्र 
(७) Cast Certificate and Non-Creamy Layer Certificate for OBC/SC/ST/VJNT/NT-B/NT-C/NT-D/SBC) 
(८) रेशन कार्ड/मतदान कार्ड 
(९) बँक पासबुक
(१०) UDID प्रमाणपत्र कार्ड
      
         दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जगण्यास सक्षम करण्याच्यादृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!