google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

बेलापूर – परळी रेल्वे मार्गास चालना द्या

भारतीय जनसंसदची मागणी; सुमारे 100 वर्षापासून प्रलंबित मार्ग

                                   स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : इंग्रज राजवटीत सुमारे 110 वर्षापुर्वी बेलापूर ते परळी या लोहमार्गाच्या कामास मंजुरी मिळवून सुरुवात झालेली होती. सुमारे 100 वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या प्रलंबित महत्त्वपूर्ण मार्गास चालना देण्यासाठी नेवासा तालुका भारतीय जनसंसदने पंतप्रधानांसह केंद्र व राज्यातील इतर संबंधितांना निवेदने देऊन त्वरित चालना देण्याची मागणी केली आहे.
       
               तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात भारतीय जनसंसदने म्हटले की, सुमारे 110 वर्षांपूर्वी बेलापूर (श्रीरामपूर ), नेवासा, शेवगाव, गेवराई, बीड, परळी अशा लोहमार्गाच्या माती भरावाचे काम झालेले आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण व संबंधित सर्व शेतकऱ्यांना जमिनीची नुकसान भरपाई दिलेली आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर या लोहमार्गास दुर्लक्षित करण्यात आल्याने ते काम ठप्प झाले होते. 
             मागील आठ दहा वर्षात या कामास काही संघटनांनी मागणी करून सुरुवात केल्याने स्व. मा. खा दिलीप गांधी, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे, विद्यमान खा. सदाशिव लोखंडे यांनी प्रयत्न केल्याने सर्वेक्षण व इतर काही कामे सुरू झाली होती. परंतु मध्यंतरी नगर – परळी हा मार्ग सुरू झाल्याने बेलापूर – परळी मार्ग पुन्हा दुर्लक्षित केला गेला. 
              हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास या मार्गावरील प्रत्येक तालुक्यात असणारी सहकारी व खाजगी साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, विविध देवस्थाने यांच्या भाविकांसाठी सोयीचे होणार आहे. जागतिक किर्तीचे देवस्थान शिर्डीचे साईबाबा, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, श्रीक्षेत्र देवगड, पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड, निंबाकाचार्य, पैठण येथील संत एकनाथ महाराज, परळी येथील औंढा नागनाथ अशी देवस्थाने जोडली जाणार आहेत. 
            या लोहमार्गाच्या मागणीसाठी यापूर्वी कुकाणे येथे सात दिवसाचे आमरण उपोषण 2017 मध्ये करण्यात आले होते. नंतर हा प्रश्न पुन्हा रंगाळलेला आहे. तरी या लोहमार्गास तातडीने चालना द्यावी असे केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आहेत .
                  नायब तहसिलदार अमोल भांगे यांना भारतीय जनसंसदने दिलेल्या निवेदनावर रामराव भदगले, कारभारी गरड, डाॕ. अशोकराव ढगे, रामकृष्ण नवले, सुखदेव पवार, अशोक ताके, प्रा.नानासाहेब खराडे, डाॕ. करणसिंह घुले, अॕड जानकीराम डौले आदिंच्या सह्या आहेत. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!