google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

प्रवरासंगम येथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन

67 वा महापरिनिर्वाण दिन

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 67 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.
                    यावेळी मा. कुलगुरु डॉ अशोकराव ढगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून थोर विचार समाजाला दिले. त्यांच्याकडे ज्ञानाची व तात्विक मूल्यांची फार मोठी शिदोरी होती. युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कठोर परिश्रमातून ज्ञानाची आराधना करावी व त्याला कृतीची जोड देऊन देशाला महान करावे, असे विचार मांडले
              याप्रसंगी मेजर खंडागळे, प्रवरासंगम ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन भालेराव, मा. सरपंच सुनीलशेठ बाकलीवाल, आरपीआयचे नेते साईनाथ शिरसाठ व कार्यकर्ते गोरडे, फाजगे, मोरे, पारखे तसेच टोका, प्रवरासंगम, माळेवाडी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ मोहनीराज कदम यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!