ब्रेकिंग
श्रीराम ग्राहक भांडारमध्ये ‘आनंदाचा शिधा’ वाटप
586 शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ; अवघ्या शंभर रुपयांत शिधा किट
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा शहरातील श्रीराम ग्राहक भांडारच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या धान्य दुकानात आनंदाचा शिधाचे वाटप शहरातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्राहक भांडारमार्फत सुमारे 586 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार असल्याचे चालक शांताराम गायके यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीराम ग्राहक भांडारच्या प्रांगणात झालेल्या आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रामजी प-हे, भगवानराव नाबदे, सुधीर जामदार, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, पत्रकार सुधीर चव्हाण, नगरसेवक राजेंद्र मापारी, माजी उपसरपंच अभिजीत मापारी, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष महेश मापारी, बहुजन समाज पार्टीचे नेते विकास चव्हाण, नितीन सराफ, मारुती पवार, राजेंद्र पवार, वैभव नहार, राजेंद्र शिंगी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आनंदाचा शिधाचे वाटप उपस्थित शिधाधारकांना करण्यात आले. यावेळी शांताराम गायके म्हणाले की गुढी पाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा अवघ्या शंभर रुपयात देण्यात येत असून एक किलो तेलाची पिशवी, एक किलो रवा, एक किलो हरबरा दाळ, एक किलो साखर या शिधाचा यात समावेश आहे शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून शिधाधारकांना दिलासा देणारा आहे. श्रीराम ग्राहक भांडार मार्फत चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून सुमारे 586 शिधापत्रिकाधारकांना शिधा किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे शांताराम गायके यांनी सांगितले. आनंदाचा शिधा वितरण प्रसंगी शिधापत्रिकाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.