क्रिडा व मनोरंजन
नेवासा येथे महामानवाला दुग्धभिषेक घालून अभिवादन
'जयभीम' च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदूमली; ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात येऊन तीस फूट प्रतिमेस जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी “जयभीम” भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदूमले होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आल्याने नेवासा शहर भीममय बनले होते. चौकाचौकात निळे झेंडे व लावलेले बॅनर नागरिकांचे आकर्षण ठरले होते. नेवासा पंचायत समितीच्या गेटजवळ उभारण्यात आलेल्या शामियान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अभिवादन करण्यासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी याच चौकात उभारण्यात आलेल्या तीस फूट उंचीच्या महामानवाच्या प्रतिमेस जनसेवक संजय सुखदान व नगरसेविका सौ. शालिनीताई सुखदान यांच्या हस्ते क्रेनद्वारे दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, डॉ. करणसिंह घुले, भाजपचे ज्ञानेश्वर पेचे, अल्ताफ पठाण, मुन्ना शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजनदादा जाधव यांच्या हस्ते तीस फूट प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मा. आ. बाळासाहेब मुरकुटे, महेश मापारी, अनंता नळकांडे, राजमहंमद शेख, अंजुम पटेल, युसूफ शेख, अस्लम मन्सूरी, रविंद्र रणशेवरे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, निरंजन डहाळे, प्रतीक शेजुळ, अजित नरुला, राजेश कडू, नगरसेवक संदीप बेहळे, विष्णू इंगळे, भास्कर कनगरे, शिवा राजगिरे, निखिल चंदानी, दत्तात्रय काळे, अजय त्रिभुवन, अँड.सादिक शिलेदार, संदिप आलवणे, मनसेचे रविंद्र पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पोतदार यांच्यासह सर्वधर्मीय सर्वपक्षीय बांधव, विविध जातीधर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेवासा शहरातील सावित्रीबाई फुले/फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय नेवासा वतीनेही भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते अनिल सोनवणे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन
सर्व समाजातील नागरीकांनी एकत्र येऊन आपन या भारतीय प्रथम नागरिक आहे हे मनाशी बाळगून पढे जायला हवे. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी नेवासा नगरपंचायतचे सफाई कामगारांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या वेळी उपस्थित अनिल जेधे यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभम चव्हाण, रंजन जाधव, हरिष दादा चक्रणारायण, प्रविण सरौदे, प्रविण नेटके, अँड चंद्रकांत कदम, विल्यम गायकवाड, संनी चव्हाण, प्रकाश चव्हाण, विजय चव्हाण, विकास वाघमारे, भारत चव्हाण, शाम साळवे, संदिप चव्हाण ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.