google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

साखर कारखान्याच्या भुश्यावर पडली वीज! 

मुळा साखर कारखान्याचा भुसा पेटला; आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू 

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या भुश्यावर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून आग लागल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
                       
           दरम्यान, आग विझविण्यासाठी विविध ठिकाणाहून अग्निशमन गाड्या आल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, प्रवरा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडे, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, शनिशिंगणापूर येथील अग्निशमन गाड्या आग विझवण्याच्या प्रयत्न करत होत्या. जेसीबीच्या सहाय्याने पेटलेल्या भूशापासून भुसा बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!