क्रिडा व मनोरंजन
अहिल्यादेवींचे कार्य सर्वच समाजासाठी प्रेरणादायी
सरपंच संजय पाटील जंगले यांचे प्रतिपादन; पानेगांव येथे अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात
स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगांव : नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पानेगांवचे मा. लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी अहिल्याबाई होळकरांचे कार्य सर्वच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप हे होते.

यावेळी जंगले यांनी सांगितले की, देशभरात मंदिर जिर्णोध्दार कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हाती घेतले. आपण भाग्यवान आहोत की चौंडी गांव हे आपल्या जिल्ह्यात आहे. अहिल्याबाईंचं जन्मस्थळ आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने ज्या कर्तबगार महिलांसाठी पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. नक्कीच अभिमानास्पद असल्याचं सांगून पानेगांव येथील दोन महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सौ. समाबाई कारभारी जंगले यांचे धार्मिक काम त्याच बरोबर आरोग्य शिक्षणाबाबत जनजागृती दुसऱ्या पुरस्काराचा मानकरी सौ.सुरेखा जनार्दन जंगले यांच बचत गटांमध्ये उल्लेखनीय काम असून बचतगट चळवळीमुळे महिला सक्षमीकरणातून महिलांना मोठे योगदान लाभले आहे. भविष्यात कै. पोपटराव पाटील संस्थेच्या वतीने चांगलं काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे जंगले यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मा.उपसरपंच रामराजे जंगले, ग्रामपंचायत सदस्य सतिश जंगले पोपटराव पाटील संस्थेचे संचालक रमेश गुडधे, पोपटराव वाघमारे, राजेंद्र शेंडगे, सिताबाई गागरे, नंदाबाई जंगले, उषाबाई जंगले, आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड यांनी केले. सुत्रसंचालन पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी केले तर आभार सुनिल चिंधे यांनी मानले.