google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

गांजा तस्करी करणारे दोघे जेरबंद

कोतवाली पोलिसांची कामगिरी; 36,000 रुपयांचा माल जप्त

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गांजा तस्करी करणाऱ्या दोन जणांना जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींकडून सुमारे 36 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे
        कोतवाली पोलिसांना दि. 29 रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, माळीवाडा बसस्थानक परिसरात काही इसम त्यांचे मोटारसायकलवरुन गांजासारखा अंमली पदार्थ विक्रीकरीता घेऊन येणार आहेत. अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी माळीवाडा बसस्थानक परिसरात सापळा लावला असता काही वेळातच तेथे एका दुचाकी वाहनावरुन दोन इसम त्यांचेकडील पाठीवरील बँगेसह सदर ठिकाणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने व ते पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांच्याकडील बॅगची पाहणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे निदर्शनास आले.
                 त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी नावे सुनील राम पवार (वय 22 वर्षे रा चिचोली फाटा ता राहुरी जि अहमदनगर) व अशोक उत्तम फुलमाळी (वय 21 वर्षे रा शास्त्रीनगर चांदा ता नेवासा जि अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यात काळपट, हिरवट रंगाची पाने, फुले काडया व बिया असलेले केनाबीस या वनस्पतीचे शेंडे म्हणजे गांजा हा 2 किलो 26 ग्रॅम व एक दुचाकी मोटारसायकल असे एकूण 36,785/- रुपयांचा मुद्देमाल कब्जात बाळगुन गांजाची विक्री करण्याचे उददेशाने दुचाकीवर वाहतुक करतांना मिळुन आले.
        पोहेकॉ तनवीर महंमदअली शेख यांचे फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५६५/२०२३ अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(क) सह २०(ब) (२) (क), २९ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.
              सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, परि.पोलीस उपाधिक्षक अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ गणेश धोत्रे, पोना अब्दुलकादर इनामदार, पोना योगेश खामकर, पोना सलीम शेख, मपोना कविता गडाख, पोकॉ संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, मपोकॉ हिना बागवान, छाया गायकवाड यांच्या पथकाने केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!