google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

नेवासा येथे ‘शासन आपल्या दारी’ आढावा बैठक संपन्न

उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांची उपस्थिती; 17 तारखेला होणार जिल्ह्यात कार्यक्रमाचे नियोजन

                                   स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची आढावा बैठक आज उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांच्या उपस्थितीत नेवासा तहसील कार्यालयात आयोजित केली होती. या वेळी तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी पाटेकर, कृषी अधिकारी हिवरे यांच्या सह कामगार तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
             ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास संपूर्ण राज्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लाभ देण्याचा कार्यक्रम घेत आहेत. हा कार्यक्रम नगर जिल्ह्यात 11 तारखेला होणार होता. त्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
                 या वेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा अधिकारी गौरी सावंत यांनी केले आणि सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी शिवसेना संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी या कामात खूप मेहनत घेतली या बद्दल सर्वाचे आभार मानले. काही सूचना देखील केल्या. त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख संजय पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व प्रशासनाचे आभार मानले परंतु त्यांनी तालुक्यात लाभार्थी कमी झाले, याबद्दल आपली नाराजीही व्यक्त केली.
               या वेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांचा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, तालुका प्रमुख संजय पवार यांच्या हस्ते आणि शिवसेना पदाधिकारी याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुम्ही सर्वांनी खूप छान काम केले परंतु या सात दिवसात काही लाभार्थी वाढले तर पहा आणि नगर जिल्ह्यात आपल्या तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ देण्याची विनंती तालुकाप्रमुख संजय पवार यांनी प्रशासकीय अधिकारी यांना केली
         ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे नियोजन उपजिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतानाच 11 तारखेचा कार्यक्रम 17 तारखेला होणार असल्याचा मेसेज आला. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी अजून आपल्याला काम करण्यासाठी 7 दिवस मिळाले आहेत, असे सर्व प्रशासकीय अधिकारी यांना सांगितले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!