google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरी

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

शासनाकडून निधी उपलब्ध

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
अहिल्यानगर : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे फेब्रुवारी महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी १९६.७० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. 
       अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन वेळेत देता यावे यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखाली २ जून २०१७ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे फेब्रुवारी २०२५ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण १९६.७० कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!