google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवासा शहरातील चोरींच्या निषेधार्थ मूक मोर्चा

नेवासकर नागरिकांच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : शहरात होणाऱ्या चोऱ्यामाऱ्याच्या निषेधार्थ नेवासकर नागरिकांच्या वतीने बुधवार (दि.3) रोजी नेवासा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला. नेवासा शहरात रात्रीची गस्त सुरू करण्यात यावी. गल्ली बोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली.
       
              नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून मूक मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात नेवासकर नागरिक व महिला सहभागी झाले होते. मुख्य पेठेतून सदरचा मुक मोर्चा नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणात आला. यावेळी भाजपचे नगरसेवक सुनील वाघ, रामराज्य उत्सव समितीचे सदस्य संतोष पडूंरे, शिवसहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष बालेंद्र पोतदार, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, अँड.मयूर वाखुरे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष संदीप आलवणे, मनसेचे सचिन गव्हाणे, डॉ. मनिषा वाघ, शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी मनोगत व्यक्त करून भुरट्या चोऱ्यांचा तपास लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा,  अशी मागणी केली.
     
                  यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. नेवासा शहरात रात्रीची गस्त सुरू करा, चोरटयांचा बंदोबस्त करा, गल्ली बोळातील चांगल्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, मागील चोऱ्यांचा तपास लावण्यात यावा, बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येऊन पोलीस स्टेशनला बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे टीव्ही संच सुरू करण्यात येऊन त्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीसाची नियुक्ती करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
   
            नेवासा शहरातील झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस यंत्रणेच्या मार्फत तपासाची चक्रे फिरवली जातील, त्यादृष्टीने पावले उचलली जातील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. यावेळी झालेल्या मोर्चा प्रसंगी त्वरित योग्य कारवाई न झाल्यास नेवासकरांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
     
               यावेळी झालेल्या मोर्चात डॉ. प्रणव जोशी, ॲड.योगेश आलवणे, बंडुशेठ सचदेव, आबा देशमुख, सतीश गायके, विलास शिंदे, अशोक ताके, राजेंद्र मापारी, तुकाराम चौधरी, अजित नरुला, राजेश उपाध्ये, रुपेश उपाध्ये, रोहित पवार, गणेश व्यवहारे, आकाश एरंडे, योगेश वर्मा, आदिनाथ पटारे, गणेश सोनवणे, विजय शिंगी, दत्तात्रय पठाडे, संदिप शुळ, मोहिनीराज सरगैयै, संदेश शिंगी, दिपक परदेशी, अमित मापारी, संतोष भागवत, सुभाष चव्हाण, विकी खराडकर, सौरभ मुनोत, शिवा मोरे, राजेंद्र परदेशी, शिवा लष्करे, शकील शेख आदींसह व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, नेवासकर नागरिक, महिला, विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!