google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

शिर्डी लोकसभा मतदार संघासह नाशिक, मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून द्या

खा. लोखंडे यांची संसदेत मागणी

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : शिर्डी लोकसभा मतदार संघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच अहमदनगर (शिर्डी), नाशिक, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना 115 टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शुन्यप्रहरात संसदेत केली.
              सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास 115 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी 15 टीएमसी पाणी मुळा, गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी टाइप बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतक-यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शकतो. उर्वरित 5 टीएमसी पाणी अकोले-संगमनेर-कोपरगाव-श्रीरामपूर या चार तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. असे एकूण 20 टीएमसी पाणी शिर्डी मतदार संघात उपलब्ध होऊ शकेल व त्‍यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. यासोबतच नाशिकसाठी 10 टीएमसी व उर्वरित 85 टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसाठी उपलब्ध होण्याबाबतची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांमार्फत पंतप्रधान यांच्याकडे केली. तसेच यासाठी पंतप्रधानांनी राज्य शासनाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव मागवून व त्यास केंद्र सरकारने मंजूरी देण्याबाबतची यावेळी विनंती केली.
लोकसभेत आज खा. लोखंडे यांनी घाटमाथ्याचे समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून ते नगर, नाशिकसह मराठवाड्याला दिले तर कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लागेल अशी मागणी केली. त्यांनी  मांडलेला घाट माथ्याच्या पाण्याचा प्रस्ताव संमत झाल्यास शिर्डी लोकसभा मतदार संघासह नाशिक, मराठवाड्याला भेडसावणारा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.संजय पवार, शिवसेना नेवासा तालुका प्रमुख.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

2 Comments

  1. Great goods from you, man. I’ve understand your
    stuff previous to and you are just extremely magnificent.
    I really like what you’ve acquired here, really like what you’re saying and the way in which you say it.
    You make it enjoyable and you still take care of to keep it wise.
    I cant wait to read far more from you. This is actually a tremendous site.

Leave a Reply to SwarajNews Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!