google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

एक लाख भाविकांनी घेतले श्री कालभैरवनाथाचे दर्शन

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील मंदिर; मंदिर परिसरात अवैध धंदे जोमात; भक्तांत नाराजी

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी दि.२१ जानेवारी रोजी सुमारे एक लाख भाविकांनी जागृत असलेल्या श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले. या निमित्ताने मंदिर प्रांगणात यात्रा भरली होती. वाढती गर्दी लक्षात घेता येथे पोलीस बंदोबस्त गरजेचा होता. पोलीस यंत्रणा कार्यरत नसल्याने भाविकात नाराजी होती. मात्र पोलीस मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी भरलेल्या यात्रेत सेवा दिली.
              नेवासा शहरापासून उत्तरेस असलेले बहिरवाडी हे श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या क्षेत्राचा कायापालट होत आहे. पौष महिन्यात येणारे रविवार हे नवसाचे मानले जात असल्याने दि. 21 जानेवारी रोजी आलेल्या दुसऱ्या पौष रविवारी सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.
   
                  पूर्वी येथे श्री कालभैरवनाथांना पशू बळी दिला जायचा मात्र भगवंत भावाचा भुकेला असून मुक्या जीवाला बळी न देता श्री कालभैरवनाथांना आवडता डाळ रोडग्याचा नैवैद्य  देवाला अर्पण करून नवसपूर्ती करा यासाठी देवगड गुरुदेव दत्त पिठाचे गुरुवर्य महंत श्री भास्करगिरी बाबांनी प्रबोधन केल्यानंतर येथे बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली.
         
             मंदिरातील श्री कालभैरवनाथांना नैवैद्य तयार करतांना तीन दगडांची चूल तयार करून गोवरीवर रोडगा भाजून श्री कालभैरवनाथांना दाळ रोडग्याचा नैवैद्य अर्पण करतात. गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या प्रेरणेने येथे विविध विकास कामे मार्गी लागत आहे तसेच त्यांनी केलेल्या आवाहनानुसार भक्तांच्या दिलेल्या आर्थिक योगदानातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे भव्य मंदिर प्रवरा नदीच्या मध्यधारेवर उभारण्यात आलेले आहे.
           भाविकांच्या दर्शनासाठी मंदिराच्या खाली असलेल्या नदीपात्रात श्री कालभैरवनाथांची पुरातन मूर्ती आज ही दर्शनासाठी खुली आहे, एरवी हीच मूर्ती पाण्याखाली असल्याने नव्याने प्रवरानदीवरील काळा पाषाण असलेली  श्री कालभैरवनाथांची मूर्ती नवीन मंदीरात बसविण्यात आली आहे.
            पौष महिन्यात आलेल्या दुसऱ्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी  मोठी गर्दी केली होती. सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून विविध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सेवेकरी बनून स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली. तसेच ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमातून योगदान दिले. पौष रविवार निमित्त मंदिर प्रांगणात विविध स्टॉल खेळणी गृहपयोगी वस्तूंच्या विविध दुकाने थाटण्यात आल्याने बहिरवाडीला यात्रेचे स्वरूप आले होते.
    
             मंदिर प्रांगणात छोट्या प्रमाणात यात्रा भरली होती मात्र एक ही पोलीस येथे नसल्याने सोरट व काळा पिवळा सारख्या अवैद्य व्यवसाय येथे सुरू होते. या सोरट चालकाने भाविक भक्तांची लूट केली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
                पौष महिन्यातील दर रविवारी बहिरवाडी येथे 
यात्रा भरत असल्याने त्यादृष्टीने उत्कृष्ट नियोजन, प्रसाद व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था श्री कालभैरवनाथ देवस्थान, तरुण मंडळे, ग्रामस्थांसह विश्वस्त मंडळाच्या करण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!