google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू

23 जानेवारीपासून आठ दिवसांत सर्वेक्षण करणार पूर्ण; 154 प्रश्न विचारले जाणार; असे असतील प्रश्न

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 

मुंबई : मंगळवार दि. 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे

सर्वेक्षणात असे 154 प्रश्न विचारले जातील.

मॉड्युल ए : मुलभूत माहिती

1. नाव:

2. पत्ता:

3. गाव/शहर:

4. तालुका:

5. जिल्हा:

6. गाव दुर्गम भागात आहे का? :

7. आधार कार्ड आहे का?

8. आधार कार्ड असल्यास त्याचा आधार क्रमांक (ऐच्छिक)

9. मोबाइल क्र / लँडलाईन क्र.:

10. वर्गवारी (कॅटेगरी):

11. आपण कोणत्या प्रवर्गातील आहात ?

12. तुम्ही मराठा आहात का ?

13. मराठा नसल्यास जात.

14. पोटजात

मॉड्यूल बी : कुटुंबाचे प्रश्न

15. निवासाचा प्रकार

16. सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहात?

17. तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसा आहे?

18. तुमचे गाव दुसऱ्या गावाशी / शहराशी बारमाही रस्त्याने जोडलेले आहे काय? अथवा पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो काय?

19. तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पुल आहे का ?

20. कुटूंबाचा प्रकार

21. पूर्वजांचे /मूळ निवासस्थानः

22. महाराष्ट्रात निवासाचा कालावधी:

23. तुमच्या जातीचा पारंपारिक व्यवसाय कोणता ?

24. कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय कोणता ?

25. व्यवसाय बदलला असल्यास, बदलाची कारणे काय?

26. सरकारी सेवेतील प्रतिनिधित्वः तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य (पुरुष किंवा स्त्री) सध्या सरकारी किंवा निमसरकारी सेवेत नोकरी करत आहे का?

27. जर हो, तर कृपया सेवेचा प्रकार नमूद करा (अचूक हुदा नमूद करा):

28. सेवा वर्ग: वर्ग 1: वर्ग 2: वर्ग 3: वर्ग4 :

29. तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य व्यावसायिक आहे का (जसे की डॉक्टर, इंजिनीअर, वकील, इ.)?

30. जर हो, तर कृपया व्यवसायाचे नाव नमूद कराः

31. जर हो, तर कोणत्या संस्थेत

32. जर हो, तर कोणत्या पदावर

33. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहे का ?

34. जर हो, तर कोणत्या पदावर कार्यरत आहे ? ते सांगा:

मॉड्यूल सी: आर्थिक स्थिती

35. उत्पन्नस्रोत: तुमच्या घराचे मुख्य उत्पनाचे स्रोत कोणते आहेत? (लागू असलेले सर्व पर्याय निवडा)

36. तुमच्या घराचे अंदाजे क्षेत्रफळ किती आहे?

37. तुमच्या घरात किती खोल्या/ रूम्स आहेत ?

38. तुमच्या घरातील मुख्य पेय जल स्रोत कोणता आहे

40. तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम प्रामुख्याने कोणते कुटुंब सदस्य करतात ?

41. स्वच्छता सुविधाः तुमच्या घरामध्ये शौचालयाची सुविधा आहे का?

42. तुमच्या घरातील सदस्य शौचास कुठे जातात ?

43. तुमच्या घरात स्नानगृह आहे का?

44. जर हो (43 मध्ये), तुमच्या घरात कोणत्या प्रकारचे स्नानगृह आहे ?

45. जर नाही (43 मध्ये), घरातील सदस्य अंघोळीसाठी कोठे जातात?

46. तुमच्या घरात स्वतंत्र स्वयंपाकाची खोली आहे का?

47. तुम्ही घरी स्वयंपाक कशावर करता?

48. कृषी (शेत) जमीन मालकी: तुमच्या मालकीची कृषी (शेत) जमीन आहे का?

49. शेतजमीन कुटुंबातील कोणाच्या नावावर आहे ?

50. जर हो, तर जमिनीचे क्षेत्रफळ किती?

51. जर नाही (48 मध्ये) असल्यास दुसऱ्याची शेत जमीन बटाईने करायला घेतली आहे का ?

52. शेतीकरिता लागणारे पाणी कोठून घेता ?

53. अ) शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध होते?

54. शेत मशागतीकरिता तुमच्या मालकीची कोणती आणि किती साधने आहेत ?

55. तुमचा शेती पूरक काही व्यवसाय आहे का?

56. जर हो, तर कोणता –

57. सध्या तुम्ही कोणत्या मुख्य पिकाची लागवड करत आहात?

कर्ज आणि आर्थिक बांधिलकी :

58. गेल्या 15 वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले होते किंवा आहे का?

59. जर हो तर तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती.

60. ते सर्व कर्ज फिटले आहे का?

61. तुमच्यावर सध्या कोणतेही कर्ज आहे का?

62. जर हो, (61 मध्ये) तर सध्याच्या कर्जाचे कारण काय आहे? (लागू असलेले सर्व निवडा)

63. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले आहे? (लागू असलेले सर्व निवडा)

64. कर्ज घेताना काही तारण/ गहाण ठेवावे लागले आहे का ?

65. जर हो असल्यास, काय तारण/ गहाण ठेवावे लागले?

66. कर्जाचा हफ्ता किंवा कर्ज फेडता आले नसल्यामुळे बँकेने / कर्ज देणाऱ्याने तुमची कोणतीही मालमत्ता ताब्यात घेतली आहे का?

67. मालमत्ता ताब्यात घेतली असल्यास कोणती ?

68. आपल्याला कधी बँकेचे कर्ज मिळू शकले नसल्यास कारण-

69. गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही कोणती स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का?

70. हो असल्यास कोणती?

71. गेल्या 15 वर्षांमध्ये आपण आपली कोणती स्थावर मालमत्ता विकली आहे का?

72. हो असल्यास विकलेल्या मालमत्तेचे स्वरुप

73. कोणत्या कारणासाठी-

74. सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न (सर्व ज्ञात स्रोतांकडून): तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे?

75. तुम्हाला आयकर भरावा लागतो काय ?

76. तुम्ही क्रिमीलेअर कॅटेगरीमध्ये येता का?

77. तुम्ही कोणतीही बचत (सेविंग) किंवा गुंतवणूक करता का ??

78. जर हो (77 मध्ये), तर कोणत्या प्रकारची बचत किंवा गुंतवणूक तुमच्याकडे आहे? (लागू असलेले सर्व निवडा)

79. विमा संरक्षण: तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना विमा संरक्षण आहे का?

80. जर हो, तर कोणत्या प्रकारचा विमा ? (लागू असलेले सर्व निवडा)

81. तुमचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहे का?

82. जर तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असाल तर तुम्हाला दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला मिळाला आहे का?

83. तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशनकार्ड आहे का?

84. तुमची शेतजमीन धरण, महामार्ग, उद्योग, पुनर्वसन प्रकल्प किंवा अन्य सरकारी प्रकल्पामध्ये गेली आहे का?

85. जर हो (84 मध्ये), असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला आहे का?

86. तुमचे घर धरण, महामार्ग, किंवा सरकारी प्रकल्पामध्ये गेली आहे का?

87. जर हो (86 मध्ये), असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला आहे का?

88. तुमच्या घरात कोणी शेतमजुरी करते का?

89. जर हो (88 मध्ये), करत असल्यास शेतमजूरी करणाऱ्या सदस्यांची संख्या सांगा.

90. तुमच्या घरात कोणी इतर मजुरी करतात का?

91. जर हो (90 मध्ये), असल्यास इतर मजूरी करणाऱ्या सदस्यांची संख्या सांगा

92. स्त्रियांना मिळणारी मजुरी कशी असते ?

93. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहेत का ?

94. जर हो (93 मध्ये), असल्यास किती सदस्यांकडे रोजगार हमीचे जॉबकार्ड आहे ?

95. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य डबेवाल्याचे काम करतो का?

इ. जर हो (88 मध्ये), असल्यास किती सदस्य डबेवाल्याचे काम करतात ?

96. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य माथाडी कामगार आहेत का?

97. जर हो (96 मध्ये), असल्यास किती सदस्य माथाडी कामगार आहेत

98. तुमच्या कुटुंबात कोणी ऊसतोड कामगार आहे का?

99. जर हो (98 मध्ये), असल्यास किती सदस्य ऊसतोड कामगार आहेत?

100. तुमच्या कुटुंबात कोणी वीटभट्टी कामगार आहे का?

101. जर हो (100 मध्ये), असल्यास किती सदस्य वीटभट्टी कामगार आहेत?

102. तुमच्या कुटुंबातील महिला इतरांच्या घरी धुणीभांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जातात का?

103. तुमच्या कुटुंबातील पुरुष सदस्य रखवालीचे/ चौकीदाराचे काम करतात का?

104. तुमच्या कुटुंबातील पुरुष इतरांची गुरे ढोरे चरायला नेण्याचे काम करतात का?

105. तुमच्या कुटुंबातील स्त्रिया इतरांची गुरे ढोरे चरायला नेण्याचे काम करतात का?

106. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रिक्षा/ऑटो / टॅक्सी चालक आहे का ?

107. तुमचे कुटुंब स्थलांतरित झाले आहे का?

108. स्थलांतर झाले असल्यास खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे तुम्ही स्थलांतरण केले आहे ? (लागू असलेले सर्व पर्याय निवडा)

109. मालमत्ता स्वामित्वः

घरात खालीलपैकी कोणत्या वस्तू आहेत?

110. पशुधन मालकी आणि तपशीलः तुमच्याकडे कोणतेही पशुधन आहे का?

111. पशुधनाचे प्रकार आणि संख्या: तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे व किती पशुधन आहे? (प्रत्येक प्रकाराची संख्या स्पष्ट करा)

मॉड्यूल डी: कुटुंबाची सामाजिक माहितीः

112. सरकारी योजनांचा लाभ : तुम्हाला कोणत्याही सरकारी कल्याण योजनांचा लाभ झाला आहे?

113. जर हो, तर कृपया लाभ मिळालेल्या प्रमुख तीन योजनांची नावे सांगाः

114. तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पध्दत आहे का ?

115. तुमच्या समाजात विधवा स्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का?

116. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का ?

117. तुमच्या समाजात विधवा स्त्रिया औक्षण करू शकतात का?

118. तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का ?

119.तुमच्या समाजात विधवांचे सहसा पुनर्विवाह होतात का ?

120. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य/ पूजापाठ करू दिले जातात का?

121. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमात आमंत्रित करतात का ?

122 तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात / शुभ कार्यात बोलावले जाते का?

123. तुमच्या समाजात विवाहित स्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे, असे बंधन आहे का?

124. तुमच्या समाजात घरातील निर्णय प्रामुख्याने कोण घेतात ?

125. तुमच्या समाजात सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीने स्रिया सहभागी होऊ शकतात काय?

126. तुमच्या समाजात महिलांना पडदा / बुरखा पध्दत आहे का ?

127. तुमच्या समाजात संपत्तीत / मालमत्तेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा मिळतो का?

128. तुमच्या समाजात स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क आहेत का ?

129. तुमच्या समाजात मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते?

130. तुमच्या समाजात मुलांचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते ?

131. मुलांचे लग्न उशीरा होत असल्यास कारणे.

132. तुमच्या समाजात कोणत्या मुलासोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेतात ?

133. तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरजातीय विवाह झाला आहे का?

134. तुमच्या कुटूंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?

135. तुमच्या समाजात, पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे काय ?

136. तुमच्या समाजात जागरण गोंधळ वा अन्य धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबडा/बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे काय ?

137. कुटुंबातील आजारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास दृष्ट काढणे/ अंगारा लावणे/ गंडा बांधणे आदी प्रकार करता काय ?

138. गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबात कोणी आत्महत्या केली आहे का?

139. जर हो (138 मध्ये), असल्यास कोणत्या सदस्याने केली होती

140 जर हो (138 मध्ये), असल्यास आत्महत्येचे कारण काय होते?

141. तुमच्या मते, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत का?

142 . तुमच्या मते, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत, असे वाटते का ?

143. तुमची जात/पोटजात दुय्यम वा कनिष्ठ समजली जाते का ?

144. समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते?

मॉड्यूल ई: कुटुंबाचे आरोग्य

145. कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी / उपचारासाठी कुठे जातात?

145 अ) तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेत नसल्यास कारण-

146. माता आरोग्य (बाळंतपणाचे स्थान): कुटुंबातील सर्वात अलीकडील बाळंतपण कुठे झाले?

147. तुमच्या कुटुंबातील सदस्याला कुत्रा/माकड चावल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता?

148. तुमच्या कुटुंबातील सदस्याला साप किंवा विंचू चावल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता?

149. तुमच्या कुटुंबातील सदस्याला कावीळ झाल्यास कुणाकडे उपचाराला घेऊन जाता?

150. बालमृत्यु आणि कुपोषणः कुटुंबातील कोणत्याही बालकाचा कुपोषण किंवा संबंधित आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाला आहे का (गेल्या पाच वर्षात)?

151. माता मृत्युः कुटुंबातील कोणत्याही गर्भवती स्त्रीचा गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर लगेचच मृत्यू झाला आहे का (गेल्या पाच वर्षात)?

152. गरज पडल्यावर तुम्हाला आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होतात का ?

153. कुटुंबातील सदस्य नियमितपणे प्रतिबंधक आरोग्य सेवा उपाय (उदा, लसीकरण, तपासणी) घेतात का?

154. मानसिक आरोग्य: कुटूंबातील सदस्याचे मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याला मानसिक आरोग्य सेवा मिळतात का?

हे सर्वेक्षण कसे केले जाईल?
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अशी माहिती दिलीय की, या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनदेखील आयोगाकडून करण्यात आलं आहे.

 

               राज्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाची संख्या पाहता हे सर्वेक्षण एवढ्या कमी कालावधीत पूर्ण करणे हे शासकीय यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!