google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

अंगणवाडी सेविकेचा निर्घृण खून

नगर जिल्ह्यातील घटना; आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेचा निर्घृण खुनाच्या गुन्हयातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. सुभाष बंडू बर्डे (वय 25 रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी हल्ली रा. चिचोंडी पाटील) असे आरोपीचे नाव असून, दि.24 रोजी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडीत ही खुनाची घटना घडली होती. अत्याचाराच्या उद्देशाने अंगणवाडी सेविकेचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
            प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी महेश विठ्ठल पवार (वय ४०, रा. चिचोंडी पाटील) यांची पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. दिनांक २४ रोजी फिर्यादीच्या पत्नी अंगणवाडीमधुन घरी आली नाही म्हणून आसपास शोध घेतला. परंतु त्या मिळून न आल्याने म्हणून त्यांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तू व रक्ताचे डाग दिसून आले. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
            घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिपत्याखाली तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी सुभाष बंडू बर्डे यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. पथकाने आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस करता मयत महिलेने आरोपीस त्याच्या मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, महिलेस एकटे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केल्याने आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीपात्रात टाकून दिल्याची कबुली दिली. आरोपीस तपासकामी नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
              सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, शरद बुधवंत, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, अमोल कोतकर, चंद्रकात कुसळकर तसेच विजय ठोंबरे, हदय घोडके, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!