google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

आयटीआय प्रवेशासाठी 22 जुलैपर्यंत मुदतवाढ

अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : जिल्ह्यातील ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.) प्रवेश घेऊ इच्छिणा-या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की ज्यांनी या पुर्वीच प्रवेशासाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी गुणवत्तेनुसार प्रवेशाची प्रथम फ़ेरी सध्या सुरु असुन ज्या उमेदवारांना प्रथम फेरीत प्रवेशासाठी नाव निश्चित झाल्याबाबत मेसेज आलेला आहे. त्यांना प्रथम फेरीत प्रवेश घेण्यासाठी असलेली अंतिम मुदत 19 जुलै ही आता वाढवुन 22 जुलै अशी करण्यात आलेली आहे. 
             तरी ज्या उमेदवारांचे प्रवेशासाठी प्रथम फेरीत नाव निश्चित झाले असेल त्यांनी संबंधित संस्थेत 22 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपस्थित राहुन आपला प्रवेश निश्चित करावा.            
               त्याच प्रमाणे ज्या प्रवेश इच्छुक उमेदवारांना या पूर्वी मुदतीत प्रवेश अर्ज सादर करता आलेले नाही त्यांच्यासाठी समुपदेशन फेरीमध्ये त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यासाठी नव्याने अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी दि. 17 ते 24 जुलै या मुदतीत अर्ज करता येतील. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुड्गाव रोड, अहमदनगर या संस्थेत ही सशुल्क (शासकीय दराने) अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी एक वेळ संस्थेत अवश्य भेट द्यावी अथवा 9699453647 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य के. ए. जहागिरदार यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!