google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

एकोप्याने विकास कामांना हातभार लागतो

गडाख यांचे प्रतिपादन; पानेगाव येथे विकास कामाचा शुभारंभ

                                      स्वराज न्यूज नेटवर्क

पानेगांव : विकास कामांना गती द्यायची असेल तर गावातील मतभेद विसरून एकोप्याने राहिले तर गावाच्या विकास कामांना हातभार लागतो पानेगांव (ता. नेवासे) येथील शिरेगांव रोड लगत असलेल्या राम मंदिर ते जंगले वस्ती व पानेगांव चिमटा रोड लगत नामदेव शेलार ते सागर जंगले वस्ती खडीकरण कामांचा शुभारंभ लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांचा हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
            मा. मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लागले असून त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झालं आहे. भविष्यात ही विकासाची घोडदौड सुरूच राहणार असून शेवटच्या घटकांपर्यंत गडाख परीवार काम करतो. गांव पातळीवर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने कलह, वाद विवाद निर्माण होत नाही. एकोपा वाढीस लागतो. आपला माणूस विधानसभेत पाठविण्यासाठी शंकरराव गडाख पाटील यांचा पाठीमागे भक्कमपणे उभा राहिले पाहिजे. काहीही काम असेल तर हक्काने सांगा पण तुमचे अंतर्गत रुसवे फुगवे आमच्यावर काढू नका आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे. यावेळी सुनिल गडाख यांनी सांगितले. यावेळी हभप कंठाळे महाराज किशोर भणगे, संजय जंगले आदींनी मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमासाठी पानेगांवचे उपसरपंच दत्तात्रय पाटील घोलप, पाराजी गुडधे, मुळाचे संचालक संजय जंगले, रंगनाथ जंगले, माजी उपसरपंच डॉ जयवंत गुडधे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, सुरज जंगले, शिवाजी तुवर, रामराजे जंगले, किशोर जंगले, जालिंदर जंगले, बबनराव जंगले, शिवाजी जंगले, राजेंद्र जंगले, साहेबराव जंगले, विजय जंगले, नारायण जंगले, विकास जंगले, नवनाथ जंगले, गोविंद जंगले, रामदास जंगले, सतिश जंगले, जगन्नाथ नवगिरे, ज्ञानेश्वर जंगले, विशाल जंगले, संकेत गुडधे, रमेश गुडधे, गुडू जंगले, सागर जंगले, नामदेव शेलार, निलेश घोलप, सोपान बिडे, बाळासाहेब घोलप, जालिंदर गागरे, जनार्दन गागरे, अर्जुन काकडे, रघूनाथ जंगले, भाऊसाहेब काकडे, अशोक काकडे, अशोक गागरे, सागर आंबेकर, डॉ काकडे, मुकुंद घोलप बाबासाहेब जिवरक, मोहन जंगले, कचरु जंगले, दत्तात्रय कल्हापुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संदिप जंगले यांनी केले. आभार अॅड मनोज दौंड यांनी मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!