google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

रूग्णाचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांना मारहाण

हार्ट बीट रूग्णालयातील प्रकार; नेवासा येथील तिघांवर गुन्हा

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 

अहमदनगर : उपचारादरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणातून डॉक्टरांसह तिघांना मारहाण करून रूग्णालयाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी (दि. 6) पहाटे दोन वाजता मनमाड रस्त्यावरील हार्ट बीट रूग्णालयात घडली. याप्रकरणी डॉ. चंद्रकांत कदम (वय 43 रा. विद्या कॉलनी, एकविरा चौक, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
   
               दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासाहेब बबन वाकचौरे, काकासाहेब बबन वाकचौरे (दोघे रा. राजंणगाव ता. नेवासा) व तीन अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन रामभाऊ वाकचौरे (वय 55 रा. राजंणगाव) हे आजारी असल्याने त्यांच्यावर हार्ट बीड रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती डॉ. कदम यांनी आप्पासाहेब बबन वाकचौरे व काकासाहेब बबन वाकचौरे यांना दिली.

               डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झालाचा राग मनावर धरून आप्पासाहेब, काकासाहेब व इतर तीन अनोळखी यांनी डॉ. कदम यांच्यासह त्यांचे सहकारी डॉक्टर अनिकेत गगे, ब्रदर विशाल काळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील मॉनिटर, एक व्हेंटिलेटर व इतर साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!