google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे निवेदन

सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी करण्याचे व इतर मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन सोमवार (दि.१६) रोजी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले.
     यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने नम्र निवेदन आहे.
सदरील योजनेच्या अनुषंगाने खालील मागण्या केल्या आहेत.
१. नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे.
२. युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीना किमान वेतन काय‌द्यानुसार किमान २०,०००/- वेतन देण्यात यावे.
३. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.
४. सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करून दयावे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले होते. त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.
५. शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असाव्यात.
६. वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!