ब्रेकिंग
‘सेंट मेरीज’च्या विद्यार्थ्यांना ‘घडी’ व शालेय साहित्य वाटप
प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘घडी’ डिटर्जंटचा पुढाकार

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : आजचा प्रजासत्ताक दिन नेवासा तालुक्यातील सेंट मेरीज स्कूलच्या चिमुकल्यांच्या नक्कीच लक्षात राहील. येथील सर्व विद्यार्थ्यांना ‘घडी’ डिटर्जंट कंपनीच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप करत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ‘घडी’ साबण, वही, शिसपेन्सिल, खोडरबर आणि बिस्कीट पुडा अशा वस्तूंचे एक पॅकेट देण्यात आले. ‘घडी’ डिटर्जंटचे ‘डिस्ट्रिब्युटर्स’ सागर खोसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कृषी शास्त्रज्ञ अशोकराव ढगे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोसी व व्यवस्थापिका सिस्टर मौली यांनी घडी कंपनीचे पवन शर्मा, अभिषेक पाल यांचे स्वागत केले. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच अभ्यासाची गोडी व स्वच्छतेची सवय अंगी बाणावी, यासाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना यावेळी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबद्दल माहिती सांगत त्याचा आरोग्य व निरोगी, आनंदी जीवनावर होणारा परिणाम समजावून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजय लोंढे यांनी केले तर सर्वांचे आभार शिक्षिका तृप्ती वाघ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्योजक सागर खोसे, किशोर सुरडे, सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता, शिक्षक संदीप सरोदे, रमेश निमसे, विष्णू खांदोडे, प्रशांत गायकवाड, पापा शेख, सकीना शेख, मुबिना शेख, स्वाती पाटील, कोमल शिंदे, संगीता पातारे, रेश्मा लोखंडे, वैशाली साळवे, सना शेख, एस्तेर गाडे, वंदना वाघमारे, योगिनी बनगर, प्रतिभा पातारे, उज्वला आगले, सुजाता भालेराव, मीनल सालवे, स्वाती पावरा आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.