google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा पोलिसांची मावा बनवणाऱ्यावर कारवाई

मावा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; मावा बनवणारी मशीन केली जप्त

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवासा पोलिसांनी तालुक्यातील देवगाव येथे केलेल्या छापेमारीत मावा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे
             पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना गोपनीय बातमीदारांकडून खबर मिळाली होती की, देवगाव येथील अशोक दगडू जामदार हे त्याचे राहते घराच्या शेजारच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला शरीरास अपायकारक असलेले व शासनाची बंदी घातलेले सुगंधित मावा तयार करण्याचे मशीन बाळगून असल्याबाबत माहिती मिळाली होती. 
        मिळालेल्या माहितीवरून नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, हरिभाऊ घायतडक, दिलीप घोळवे, म्हैसमाळे यांच्या पथकाने दोन पंचांसमक्ष संशयित इसम अशोक जामदार याचे रहाते घरी छापा घातला असता मावा बनवण्याचे अंदाजे 10 हजार रुपये किमतीचे मशीन मिळून आले. 
          याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावा बनवणारा इसम अशोक दगडू जामदार यांच्या अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.
            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!