google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवासा शहरातील अवैध धंदे बंद करावेत

शिवसेनेने दिले पोलीस निरीक्षकांना निवेदन; अवैध व्यवसाय बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा

                                   स्वराज न्यूज नेटवर्क

नेवासा : नेवासा शहरात वाढत असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नेवासा पोलीस स्टेशनअंतर्गत दोन महिन्यापासून नेवासा शहर, बाजारपेठ तसेच धार्मिक स्थळाजवळ सर्रासपणे मटका, ऑनलाईन मटका, जुगार, अवैध दारू विक्री सर्रासपणे चालू आहे. 
             निवेदनात पुढे म्हटले आहे की, तोंडी विनंती करूनही शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत दखल घेतलेली नाही. तरी आपण त्वरित अवैध व्यवसाय बंद करावेत अन्यथा कुठलीही पूर्व सूचना न देता महिला आघाडीच्या वतीने अचानकपणे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस स्टेशन नेवासा यांची राहील.
        यावेळी दिलेल्या निवेदनावर शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मीराताई गुंजाळ, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष भाऊसाहेब कांगुणे, शहर उपाध्यक्ष बंडूभाऊ शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!