google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

एसटी बसच्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू

एसटी बसची मोटारसायकलला धडक; पती व मुलगी जखमी; नेवासा तालुक्यातील घटना

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारातील हॉटेल धनश्रीजवळ एसटी बसची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या माळीचिंचोरा ग्रामपंचायतच्या सदस्या प्राजक्ता धानापुणे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती बापूसाहेब धानापुणे व मुलगी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

                    याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार (दि. 17) रोजी माळीचिंचोरा येथील बापूसाहेब लक्ष्मण धानापुणे व त्यांची पत्नी प्राजक्ता बापूसाहेब धानापुणे (वय 25) आपल्या तीन वर्षीय मुलीसह मोटारसायकल (एमएच 17 बीबी 4955) वरून वडाळा बहिरोबा येथे दवाखान्यात जात असताना दुपारी 12 वाजेच्या सुमारास अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ उभी असलेली एसटी बस (एमएच 14 बीटी 4312) ही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाण्यासाठी वळत असताना या बसची मोटारसायकलला धडक बसल्याने झालेल्या अपघातात ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता धानापुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती बापूसाहेब धानापुणे व मुलगी हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

                 नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मयत प्राजक्ता धानापुणे यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान माळीचिंचोरा या ठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.

                  अपघातात मृत्यू पावलेली प्राजक्ता ही 4 महिन्याची गर्भवती असल्याचे समजते. त्यामुळे माळीचिंचोरा गावासह नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 96/2023 भादंवि कलम 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!