google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवासा फाटा येथे दोघे लाचखोर जेरबंद

एक लाखाची लाच घेताना पकडले; पतसंस्थेच्या चेअरमनकडे मागितली होती लाच 

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : नेवासा खुर्द येथील एका पतसंस्थेच्या चेअरमनकडून एक लाख रूपयांची लाच घेताना अहमदनगर येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक (वर्ग 2) किसन दिगंबर सागर (वय 55 रा. सातारा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) व खासगी लेखा परीक्षक तय्यब वजीर पठाण (वय 48 रा. जळके खुर्द ता. नेवासा) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी नेवासा फाटा येथील बाळूमामा ज्युस सेंटर येथे ही कारवाई केली.

           या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे एका पतसंस्थेचे चेअरमन होते, सदर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक यांना दिले होते. आरोपी यांनी तक्रारदार  व त्यांचे नातेवाईक यांचा नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविणेसाठी व लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे लकडे 3 लाखांची मागणी केली होती. तडजोड अंती  2 लाखांची मागणी केली. तक्रारदार यांनी मागणी केलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये देण्याची विनंती केली. सदर लाच रक्कम आज रोजी बाळूमामा ज्युस सेंटर, नेवासा फाटा येथे पंचासमक्ष स्विकारली असता दोन्ही आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले.
      लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार, हरुन शेख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांच्या पथकाने वरील कारवाई केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!