google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

आंदोलनाचा पाचवा दिवस; संपामुळे नागरिकांचे हाल; विविध कामे रखडली,

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा येथे महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असल्याने सदर संपामुळे नागरिकांचे फारच हाल होत असून अनेक महत्वाची कामे रखडली आहे. शासनाने अधिक अंत न पाहता आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा संपातील सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी संपाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी व्यक्त केली आहे.
           महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात शासन स्तरावरुन कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारून आंदोलन सुरू केले आहे, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संदर्भीय निवेदनाद्वारे संघटनेमार्फत आंदोलन करण्याचा इशारा शासनास देण्यात आलेला आहे.
             त्यानुसार अहमदनगर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सदर आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून काळया फिती लावून काम करणे, दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कार्यालयासमोर निदर्शने करणे, लेखणी बंद आंदोलन करणे असे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दि.१५ जुलैपासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
            नेवासा येथे सुरू असलेल्या महसूल कर्मचारी संपामध्ये महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष फिरोज सय्यद, अतुल भांगे, धीरज साळवे, अमिता कासार, संतोष गव्हाणे, श्रीमती दहिफळे, साईनाथ उप्पोड, श्रीकांत दातीर, मनोहर डोळस, श्रीपती उमाप, अशोक टिळेकर, माया आदिक, सुशीला खोमणे, कोतवाल अध्यक्ष योगेश मिसाळ व इतर सर्व नेवासा तालुक्यातील कोतवाल सहभागी झालेले आहे.
          सदरच्या संपामुळे नेवासा तहसील कार्यालयात विविध कामांसाठी दूरवरून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे फारच हाल होत आहे, सद्या विविध दाखले काढण्यासाठी लोक येतात, त्यांची कामे अडकून पडली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित तोडगा काढावा व महसूल कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी संपात सहभागी झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे.
या आहेत मागण्या –
वेळेवर वेतन व्हावे, वैद्यकीय देयके दोन-तीन वर्षापासून प्रलंबित आहेत, महसूल सहाय्यक यांचा ग्रेड पे तलाठीपेक्षा कमी असल्याने तो वाढवण्यात यावा. नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी वर्ग तीनची असून ती सुधारण्यात यावी. महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध 2006 मध्ये करण्यात आला होता तो बदलण्यात यावा. महसूल विभागामध्ये असलेले अव्वल कारकून या पदाचा शब्द हा फारसी आहे त्या ठिकाणी दुसरा शब्द वापरण्यात यावा.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!