google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा येथे महामानवाला अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन; गोरगरिबांची मुले उच्च पदावर गेली ही किमया डॉ. आंबेडकरांनी केलेल्या संघर्षामुळेच; पोलीस उपअधीक्षक खाडे यांचे प्रतिपादन

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यासाठी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दलित बहुजन चळवळीतील नेते अँड.संजय सुखदान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. गोरगरिबांची मुले ही आज उच्च पदावर गेली ही किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षामुळे असल्याने त्यांनी केलेल्या कायदा व कलमांचे पालन करून त्यांच्या विचारांना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी संतोष खाडे यांनी केले.
   
         नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुष्पांजली अर्पित करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जय…भीम..जय जय भीम असा जयघोष यावेळी करण्यात आला.
         यावेळी आलेल्या मान्यवरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक अँड. संजय सुखदान यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. नेवासा शहरात अतिक्रमण कारवाईमुळे व्यापारी हवालदिल झाले असल्याने आम्ही कोणतीही वर्गणी गोळा न करता जयंती निमित्ताने फक्त अभिवादन कार्यक्रम ठेवला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण अंगीकारून समाजात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      
         यावेळी पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यामुळेच आज मी उपअधीक्षक या पदावर आहे. कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्यांची मुले उच्च पदावर जावी म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी १४ व्या कलमाद्वारे मोफत व सक्तीचे शिक्षण आम्हाला मिळवून दिले. आज गोरगरिबांची मुले जी उच्च पदावर दिसत आहे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच किमया असल्याचे त्यांनी सांगितले.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला हक्क दिला. त्यांनी निर्माण केलेल्या कायद्यांच्या आधारे बनवलेल्या नियमांचे पालन करा, ग्रामीण भागातील तरुणांनी मध्येच शिक्षण न सोडता डॉ. आंबेडकर यांनी आरक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या संधीचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. युवकांनो गुन्हेगारीकडे वळू नका. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा असे आवाहन संतोष खाडे यांनी यावेळी बोलतांना केले.
           यावेळी झालेल्या जयंती कार्यक्रम प्रसंगी नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप पाठक, अँड.बन्सीभाऊ सातपूते, रामभाऊ केंदळे, पंचगंगाचे बाळासाहेब शिंदे,विजय अंकल गायकवाड,इंजिनिअर सुनीलराव वाघ, महंमदभाई टेलर, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, नेवासा प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, प्रेस क्लब अध्यक्ष मोहन गायकवाड, श्रीमती वंसाबाई सुखदान, रविंद्र रणशेवरे, शीलाताई रणशेवरे, दिनेश व्यवहारे, निलेश जगताप, गणेश ढोकणे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
          
          जयंती कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र मापारी, संदीप बेहळे, विकास चव्हाण, अरुण जाधव, माधव नन्नवरे, महेश मापारी, मनोज पारखे, सतीश गायके, अजित नरुला, सुरेश लव्हाटे, अजय त्रिभूवन, विष्णू इंगळे, नारायण कोरेकर, जयकुमार गुगळे, मनोज भोसे, मुन्ना शेख, सतीश चक्रनारायण, बापूसाहेब गायके, बाबासाहेब तागड, रामभाऊ सुरोशे, बापूसाहेब देवढे, संदीप वीर, रमेश राजगिरे, संजय वाघमारे, गणेश कोरेकर, अरविंद घोडके, राहुल आठरे, योगेश रासने, सनी चव्हाण, दाऊद बागवान, संदीप आलवणे, सलीम सय्यद, बाळू पोटफोडे, राजेंद्र मुथा, अमोल सुरोशे, आदिनाथ पटारे, रुपेश उपाध्ये, राम घोलप यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य, घटनापती प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह नेवासा शहरातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर अँड. संजय सुखदान यांनी उपस्थित सर्वधर्मीय नागरिकांचे आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!