google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा आठवडे बाजार राहणार बंद

उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश; कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक निवडणुकीचे कारण

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक निवडणुक सन 2023 ते 2028 करीता रविवार (दि 30) मतदान होत असल्याने या दिवशी नेवासा शहराचा आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत उपविभागीय दंडाधिकारी, अहमदनगर यांनी आदेश केले आहेत.
                     या संदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, रविवार, 30 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक निवडणुक सन 2023 ते 2028 करीता सकाळी 8.00 ते 4.00 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी सोसायटी मतदार संघात 1679, ग्रामपंचायत मतदार संघात 1152 आणि व्यापारी मतदार संघात 407 मतदान होणार आहे. संपुर्ण नेवासा तालुक्यातील मतदान नेवासा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवासा खु. आणि जिल्हा परिषद उर्दु शाळा, नेवासा येथे एकाच ठिकाणी एकुण दहा मतदान खोल्या बूथवर होणार आहे. त्यामुळे मतदान होण्याच्या दिवशी वाहनांची आणि मतदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याच परिसरात शाळेलगत आठवडे बाजार रविवारी होणार असल्याने मतदानासाठी येणारे मतदार आणि आठवडे बाजार यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
             वरील बाबींचा विचार करता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेसाठी रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी नेवासा शहरात भरणारा आठवडे बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याचे सुधीर पाटील, उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग अहमदनगर यांनी म्हटले आहे. मार्केट अँड फेअर अँक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून मौजे नेवासा खुर्द (नेवासा शहर) येथील दि. 30 एप्रिल रोजीचा आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आदेश पारीत केले आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!