google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरी

युवकांनी विविध क्षेत्रात तज्ञ व सामाजिक कार्यकर्ते व्हावे

मा.आ. संभाजीराव फाटके यांचे प्रतिपादन; डॉ. अशोकराव ढगे यांनी घेतली खास मुलाखत

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्याचे ज्येष्ठ नेते व मा. आ. संभाजीराव फाटके पाटील यांच्या वयाला आज 31 मे रोजी 76 वर्षे पूर्ण होत असून ते 77 वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने त्यांची डॉ. अशोकराव ढगे यांनी घेतलेली खास मुलाखत.
               आजच्या राजकीय परिस्थितीबद्दल फाटके यांनी तीव्र खंत व्यक्त करून राज्यकर्त्यांनी सर्व परिस्थिती बिघडविण्याचे काम चालवले आहे असे प्रतिपादन केले. राजकीय क्षेत्रात तात्विक मूल्य तसेच विधेयक विचारधारा व त्या अनुषंगाने निष्ठा या खूपच कमी झाले आहेत. राजकीय नेते प्रसिद्धी माध्यमातून वैयक्तिक चिखलफेक करतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने रचनात्मक व विधायक कामाच्या बद्दल विचार मंथन होणे आवश्यक असते तथापि आज माध्यमातून प्रश्न संदर्भात चर्चा घडणे आवश्यक आहे प्राप्त स्थितीमध्ये देशासमोर अनेक प्रश्न आहेत. मी माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये स्वच्छ कारभार, भ्रष्टाचारापासून दूर व तळमळीने गोरगरिबांची सेवा केली मात्र आज नेत्यांमध्ये गांभीर्याने प्रश्नाचा अभ्यास करण्याची दानत आढळून येत नाही.
              युवकांना सल्ला देताना संभाजीराव म्हणाले की युवकांनी अभ्यास व सातत्याच्या जोरावर विविध क्षेत्रात शास्त्रज्ञ व्हावे कारण आज देशाला शास्त्रज्ञांची व तज्ञांची खूपच गरज आहे. युवकांनी राजकीय नेत्यांच्या पाठीमागे न धावता ध्येनिष्ठ व समाजनिष्ठ कार्यकर्त्यांना अभ्यासुवृत्ती अंगी करावी. समाजामध्ये दारिद्र्य बेकारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवर अत्याचार व दुराचार याचे प्रमाण दुर्दैवाने वाढले आहे. यासाठी निष्पक्षपातीपणे राष्ट्राचा विकास हे ध्येय असले पाहिजे. याप्रसंगी मा. आ. संभाजीराव फाटके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन प्राचार्य डॉक्टर अशोकराव ढगे यांनी मुलाखत संपवली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!