google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगराजकिय

शिक्षक मतदारसंघ निवडणूक पुढे ढकलली

निवडणूक आयोगाकडून जाहीर; 'हे' आहे कारण

                                        स्वराज न्यूज नेटवर्क 
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांकरिता भारतीय निवडणूक आयोगाने दि. 8 मे रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले होते.
            या निवेदनाचा विचार करून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!