google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

राज्यात मोठा राजकीय भूकंप 

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड 

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह निम्म्याहून अधिक आमदार गळाले लागले आहेत. राष्ट्रवादीतील 9 नेत्यांचा आज ( दि. 2) शपथविधी झाला असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

          2019 च्या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळचे त्यांचे पहाटेचे बंड अवघ्या काही तासांमध्ये फसले. आता मात्र त्यांनी रविवारचा मुहूर्त साधत बंडाचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादीच्या तब्बल 35 आमदारांसह त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याला पुन्हा धक्का दिला. 

                राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांना मंत्रिपद देण्यात आली आहेत. त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारला समर्थन देत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

             या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.

              आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला.

                  अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!