google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नगर अर्बन बँकेचा ठेवीदारांना दिलासा

प्रेस नोट जारी

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : जिल्ह्यातील प्रसिद्ध नगर अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेचा बुधवारी भारतीय रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. असे असतांनाच नगर अर्बन बँकेने ठेवीदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने याबाबत एक प्रेस नोट जारी केली आहे.
           जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, नगर अर्बन को. ऑप. बँक लि., अहमदनगर (मल्टी-स्टेट शेडयुल्ड बँक) संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेचे बँकींग परवाना दिनांक 4 ऑक्टोबर रोजी कामकाजाचे वेळेनंतर रद्द केला आहे. बँकेवर विश्वास ठेऊन बँकेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेला पैसा केंद्रीय निबंधक, नवी दिल्ली यांचेमार्फत पुढील आदेश पारीत झाल्यानंतर परत देणेबाबतचे प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
          बँकेचे एकूण एक लाखापेक्षा जास्त सभासद असून बँकेच्या 36 शाखा आहेत. तसेच बँकेचे एकूण रक्कम रुपये 322.59 कोटीच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेकडे ठेवल्या आहेत. त्यांच्या ठेवी सुरक्षित असून केंद्रीय निबंधक कार्यालयाकडून पारीत होणाऱ्या पुढील आदेशानुसार कामकाज होईल.
               ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत काही शंका असल्यास बँकेच्या शाखा कार्यालयाचे ठिकाणी तसेच प्रधान कार्यालयात ठेवीदारांचे, ग्राहकांचे शंकांचे निरसन केले जाईल, असे आवाहन बँकेचे प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!