स्वराज न्यूज नेटवर्क
याबाबत सुमन ज्ञानेश्वर इंगळे (वय 40) धंदा-घरकाम रा. मधुबन कॉलनी जुना जालना यांनी नेवासा पोलीस ठाण्यात हजर होवुन लेखी फिर्याद दिली की, 28 ऑक्टोबर रोजी मी माझे नातेवाईकांसह आळंदी येथे देव दर्शन करण्यासाठी निघालो असता नगर हायवे वरील हॉटेल काळे बंधु ता. नेवासा समोर संभाजीनगर ते नगर जाणारे रोडलगत सकाळी 10:30 वाजेचे सुमारास नाष्टा करून आम्ही आमचे गाडीत बसण्याचे तयारीत असताना पाठीमागुन एक बजाज पल्सर विना क्रमांकाचे गाडीवरील दोन अनोळखी इसम माझे पाठीमागे येऊन त्यातील काळे जर्किंग घातलेला इसम याने माझ्या पाठीमागून हात घालुन माझे गळ्यातील मिनी गंठण बळजबरीने ओरबाडून घेऊन त्याचे सोबत पिवळा शर्ट घातलेला अनोळखी इसम हा त्याचेकडील बजाज पल्सर मोटारसायकलवर नगरच्या दिशेने जोरात निघुन गेले.