स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगांव : जिल्ह्यात शिवछत्रपती अश्वारूढ पुतळ्याने तसेच अंतर्गत विकासाने ओळख निर्माण झालेल्या तसेच अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मुळाथडी परिसरातील मा. मंत्री आ. शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनीलभाऊ गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. उर्वरीत पानेगांव येथील ग्रामपंचायत निवडणूक दि. पाच ऑगस्ट रोजी मतदान पार पडले होते. लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी 10 जागा होत्या. 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. लोकनियुक्त सरपंच सह प्रभाग नं एक मध्ये एका जागेवर सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती.
पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक निरीक्षक म्हणून नेवासा नायब तहसीलदार किशोर सानप हे उपस्थित होते. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता मच्छिंद्र भोसले, पिठासिन अधिकारी यांनी काम पाहिलं. ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी उपसरपंच निवडणुकीबाबत माहिती देवून नवनिर्वाचित सदस्यांची ओळख करून दिली. त्याच बरोबर उपसरपंच पदासाठी सदस्य हनुमंता घोलप यांचा अर्ज आला असल्याचे सांगितले. निवडणूक निरीक्षक नायब तहसीलदार किशोर सानप यांनी उपसरपंच पदी घोलप यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगितले.
यावेळी पानेगांव येथील मा. लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी केलेल्या विकासाभिमुख कामाबद्दल नायब तहसीलदार सानप यांनी गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले. लोकनियुक्त मा. सरपंच यांनी आमदार शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनीलभाऊ गडाख यांचा मार्गदर्शनाखाली विकास झाला असून असंच पुढचे काम नव्या टीमने करावे, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुरेश जंगले, शांताबाई जंगले, कुसूम शेंडगे, रमेश जंगले, दिपाली जंगले, चंद्रकला गुडधे, मिना जंगले, रंजना जाधवसह मा. लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, मा. उपसरपंच रामराजे जंगले, अनिल जंगले, किशोर जंगले, डॉ काकडे, विठ्ठल आरंगळे, काकासाहेब जंगले, संदिप जंगले, निवृत्ती जंगले, सुभाष गुडधे, रमेश गुडधे, बाळासाहेब जंगले, नानासाहेब जंगले, सतिश जंगले, बद्रिनाथ जंगले, निलेश घोलप, ताराचंद घोलप, प्रविण घोलप, मुकुंद घोलप, मच्छिंद्र घोलप, तानाजी घोलप, नामदेव गुडधे पाराजी गुडधे, भाऊसाहेब काकडे, रघुनाथ जंगले, रमेश गुडधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, पिंटूभाऊ जंगले, तुकाराम चिंधे, तानाजी गायकवाड, गुलाब गायकवाड, दादासाहेब काकडे, कचरु जंगले, सुरेंद्र जंगले, उद्धव चिंधे, सागर आंबेकर, बाबासाहेब शेंडगे, सुनिल चिंधे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सोनई मंडल अधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी भाऊसाहेब पतंगे, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ मृत्यूजंय मोरे, मुळे, सचिन ठोंबरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सूत्रसंचालन बाळासाहेब नवगिरे यांनी केले. प्रस्ताविक सुभाष गुडधे तर आभार सुरज जंगले यांनी मानले.
नवनिर्वाचित उपसरपंच हनुमंत उर्फ दत्तात्रय पाटील घोलप यांचे अभिनंदन मा. मंत्री शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनीलभाऊ गडाख पाटील, मा. सभापती सुनिताताई गडाख, मुळाचे संचालक संजय जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.