google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

होमगार्डच्या विविध भत्त्यात भरीव वाढ

शासन निर्णय जारी; होमगार्डमध्ये समाधानाचे वातावरण

                                    स्वराज न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये होमगार्ड जवानांसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या विविध भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे.

           राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ चाळीस हजार होमगार्डं जवानांना होईल.

          सध्या होमगार्डं यांना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात. तो आता 1 हजार 83 रुपये करण्यात आला आहे. याशिवाय उपहार भत्ता 200 रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता 100 रुपये, भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यासाठी येणाऱ्या सुमारे 795 रुपये कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            मागील अनेक दिवसांपासून होमगार्ड जवानांच्या विविध भत्यांमध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. अखेर होमगार्ड जवानांच्या मागणीला यश आले असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मानधन वाढीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता होमगार्ड जवानांना कर्तव्य भत्ता 1,083 व उपहार भत्ता 200 रुपये असे एका दिवसाचे 1,283 रुपये मानधन मिळणार आहे.

         दरम्यान केलेल्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी होमगार्ड जवानांना अनेक महिन्यांची वाट पहावी लागते. तरी सदर मानधन हे वेळेवर देण्यात यावे, अशी अपेक्षा होमगार्ड जवानांकडून व्यक्त होत आहे. तसेच मिळणारे काम हे 365 दिवसांचे असावे किंवा किमान 11 महिने तरी असावे, ही होमगार्डची मागणी अजूनही कायम आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!