शिर्डी : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून शिर्डी शहर परिसरात वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याबाबतपोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे शिर्डी परिसरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 15 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. यात 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डीतील एकाच वेळी हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आले. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी मिटके यांचे कौतुक केले.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, पोलीस निरीक्षक डांगे, पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात, पोलीस उपनिरीक्षक बोरसे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा