google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

सरकारकडून भाऊबीज जाहीर; ४०.६१ कोटी रुपयांची तरतूद

                                   स्वराज न्यूज नेटवर्क 

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

           एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹ ४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

                 अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

             भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल, असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

           अंगणवाडी सेविका व मदतनीस या खऱ्या अर्थाने फिल्डवर काम करत असतात. त्यांची मेहनतची दखल वेळोवेळी सरकारकडून घेतली गेली आहे. सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होते. त्याच बरोबर आता या अंगणवाडी सेविकांची दिवाळी ही गोड होणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!