google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा नगरपंचायतसमोर ‘आंघोळ आंदोलन’

'मी नेवासकर' संघटनेकडून 'पोलखोल'; नगरपंचायत आणि 'विद्युत' ने घेतली दखल

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : अनेक वर्षापासून नेवासा शहरातील नागरिकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी वेळोवेळी आंदोलने करून सुद्धा त्या आंदोलनाची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नव्हती. नेहमी नेवासा शहरात दिवसाआड येणारे पाणी दीड-दोन वर्षापासून दहा दिवस, पंधरा दिवस तर कधी वीस दिवस असा पाणीपुरवठा नेवासा शहराला होत असून नेवासा नगरपंचायतच्या धोरणाला कंटाळून ‘मी नेवासकर संघटना’ आणि नेवासा शहरातील नागरिकांनी सदर कार्यालय व संबंधित कार्यालयाचे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
        यावेळी ‘मी नेवासकर’ संघटनेचे शांताराम गायके यांनी नेवासा शहरातील पिण्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. समर्पण फाउंडेशनचे डॉ. करण घुले यांनी सुधारीत पाणी योजना सुरू करण्यात यावी. शहरातील नागरिकांना मुबलुक पाणी वेळेवर मिळावे आणि एक्स्प्रेसवरील लाईट होणारा तुटवडा थांबवण्याबाबत मत प्रकट केले. नेवासा शहरातील नागरिकांचा अंत संबंधित कार्यालयाने आणि प्रशासनाने व अधिकाऱ्याने घेवू नये अन्यथा नागरिकांच्या उद्रेकापुढे संबंधित अधिकाऱ्यांचा निभाव लागणार नाही, असा इशारा विकास चव्हाण यांनी दिला.
          यावेळी मा. सरपंच सतिष गायके, नगरसेवक संदीप बेहळे आपचे संदिप आलवणे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सदर आंदोलनाच्या ठिकाणी नेवासा शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन मोठ्या प्रमाणात आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.
            नेवासा शहरातील नागरिक महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने संताप प्रकट करताना दिसले. यावेळी अनिल सोनवणे, शिवा राजगिरे, शिवाजी गायकवाड, मनेष चव्हाण, प्रकाश चव्हाण, हारुण जहागिरदार, नविद शेख, संपत लष्करे, रौफ सैय्यद, राजु कनगरे, आशफाक पठाण, संपत आळपे तसेच महिला  रेलकर ताई, व्यवहारे ताई, शोभाताई आलवणे यावेळी उपस्थित होत्या. या वेळी नेवासा पोलिस निरीक्षक महेश पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जनसामान्य नागरिकाचा भावनांचा आदर करून संबंधित कार्यालयाचे नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष लांडगे तसेच विद्युत महामंडळाचे कार्यकारी उपअभियंता बडवे साहेब यांनी लेखी आश्वासन देऊन येत्या आठ दिवसांमध्ये नेवासा शहराचा पाणीपुरवठा व एक्सप्रेस फिडरवर लाईट ही सुरळीत करण्यात येईल हे लेखी आश्वासन घेऊन सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!