google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

‘संजय गांधी’ व ‘श्रावण बाळ’साठी आधार अपडेट सक्तीचे

लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर मिळणार पैसे; अन्यथा विसरा 1500 रुपये!

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : राज्य शासनाकडून निराधारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिनाकाठी अनुदान अदा केले जाते. हे अनुदान लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यावर जमा केले जाते. परंतु आता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे करण्यात येणार आहे. नियमित अनुदान मिळविण्यासाठी निराधारांचे आधार अपडेट व बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. नेवासा तालुक्यामध्ये मार्चअखेर 79 टक्के आधार सिडींग काम पूर्ण झाले आहे.
                   नेवासा तालुक्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे 5338 लाभार्थी आहेत. त्यापैकी 4223 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. व त्यांना मार्च अखेर डीबीटी द्वारे लाभ देण्यात आलेला आहे. तालुक्यातील 1115 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. त्यांच्या नावांच्या याद्या संबंधित तलाठी कार्यालयांकडे देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही तर भविष्यात त्यांचा लाभ बंद होऊ शकतो.
             संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यासह विशेष सहाय्य योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता तसेच वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत होत्या, मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरतही थांबणार आहे.
…तर अनुदान बंद
 लाभार्थ्यांना एप्रिलपासूनचे अर्थसाहाय्य केवळ डीबीटी पोर्टलवरून आधार वैध असणाऱ्या लाभार्थ्यांनाच दिले जाणार आहे. उर्वरित आधार अवैध असणाऱ्या म्हणजेच बँक खाते आधार संलग्न नसलेल्या लाभार्थ्यांना तसेच आधार अपडेट नसलेल्या लाभार्थ्यांना अनुदान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी केले आहे
अशी करून घ्यावी प्रक्रिया
श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, दिव्यांग वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी डीबीटी प्रणालीद्वारे अर्थसाहाय्य प्राप्त करण्यासाठी आपले आधार अद्ययावत (अपडेट) आहे की नाही याची खात्री करावी. आधार अद्ययावत नसल्यास ते आधार केंद्रामध्ये जाऊन अद्ययावत करून घ्यावे. त्यानंतर लाभार्थी यांचे बैंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न आहे की नाही याची पडताळणी करावी. बँक खाते आधार संलग्न नसल्यास बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावी, त्यानंतर लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड व बैंक पासबुक हे तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत जमा करावे. पुढे, तहसील कार्यालयाच्या वतीने डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती भरली जाईल.
सरकारी लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना आधारकार्ड, बँक खात्याला मोबाइल क्रमांक लिंक करावा लागेल, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, मोबाइल क्रमांक तलाठ्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणारे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतात. -संदीप चिंतामण, नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, नेवासा.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!