
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करण घुले यांनी भुषविले. या वेळी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ करण घुले पाटील यांनी डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी, शेतकरी,कामगार शोषित वंचित असलेल्या समाजातील लोकांना प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अनेक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी चित्रपट, पोवाडे , वाड्मय आणि आपल्या लेखनातून समाज प्रबोधनाचे कार्य भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या वेळी डॉ. प्रा. रवी चव्हाण यांनी नुकतेच राजकीय विषयांवर पी.एच.डी पूर्ण केल्याबद्दल घुले यांच्या हस्ते सत्कार करुन गौरविण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांनी सर्व समाजासाठी मोलाचे कार्य केले. आपल्या प्रबोधनातुन सामाजिक कार्याची दखल घेऊन सातासमुद्रापार रशियामध्ये अनेक देश एकत्र येऊन डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. बाहेरच्या देशांनी सुध्दा अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेतली आहे. अशा प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे कार्य मनी बाळगून समाज हिताचे काम करवे, असे उदगार प्रा. रवी चव्हाण यांनी केले.
तदनंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासमोर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले / फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विकास चव्हाण यांनी सुत्रसंचालन करून कार्यक्रमाची माहिती विषद केली. नगरसेवक फारुख आत्तार, अनिल सोनवणे, शांताराम गायके, संपत आळपे, गणेश पंढुरे, अक्षय, जाधव, कामगार संघटनेचे अध्यक्ष सनी चव्हाण, नानासाहेब आरगडे, संतोष चव्हाण, मनेष चव्हाण, भारत चव्हाण, मनोज चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, दिपक चव्हाण, यश चव्हाण, शुभम चव्हाण, अभिषेक चव्हाण, रामा चव्हाण, हर्षल चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी कामगार नेते सनी चव्हाण यांनी आभार मानले.