नोकरी
नगर येथे ऑनलाईन रोजगार मेळावा
23 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन; बेरोजगार युवक, युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने दिनांक 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करून व ज्यांची नाव नोंदणी झालेली आहे त्यांनी लॉगीन करुन पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे व ऑनलाईन पद्धतीने या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0241-2995735 किंवा रोजगार मेळावा समन्वयक स्वप्नील ठाणगे मो. नं. 9822181114 व संतोष वाघ मो. नं. 8830213976 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.