
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : विधानसभा निवडणुकीकरिता 24 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले होते. आज छाननीमध्ये 24 उमेदवारांच्या 33 अर्जांपैकी दोन अर्ज हे बाद ठरवण्यात आले आहेत. आता 24 उमेदवारांचे 31 अर्ज निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख यांनी चार अर्ज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे तीन अर्ज, सुनिता गडाख यांचे दोन अर्ज व अन्य विठ्ठल लंघे (शिवसेना शिंदे गट) अब्दुल शेख (राष्ट्रवादी अजित पवार गट), हरिभाऊ चक्रनारायण (बसपा), शशिकांत मतकर (रासप), तर अपक्ष म्हणून ऋषिकेश शेटे, सचिन देसरडा, आशाताई मुरकुटे, संतोष काळे, लक्ष्मण कांबळे, पोपट सरोदे, मुकुंद अभंग, रत्नमाला लंघे, अजित काळे, ज्ञानदेव पाडळे, वसंत कांगुणे, जगन्नाथ कोरडे, सचिन दरंदले, गोरक्षनाथ कापसे, शरद माघाडे, रामदास चव्हाण, रविराज गडाख यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल झालेल्यांपैकी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या तीन अर्जांपैकी दोन अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे रद्द करण्यात आले असून त्यापैकी प्रहार जनशक्ती पक्षाचा अर्ज वैध राहिला आहे. भाजपाचे माजी आमदार राहिलेले मुरकुटे आता प्रहार पक्षाकडून उमेदवारी करणार आहेत.