google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा, कोपरगाव, पाथर्डीमध्ये पोलिसांची कारवाई

१० आरोपींविरुद्ध कारवाई; ६१ लाख ७४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध विशेष पथकाच्या माध्यमातून १५ व १६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांमध्ये एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले. यात १० आरोपींविरुद्ध कारवाई करून तब्बल ६१ लाख ७४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
             कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करताना पाच वाहने यात चार डंपर आणि एक ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईत अर्जुन गुरुळे, संतोष ठमके, गणपत पवार, अमोल इंगळे आदी चालक आणि वाहनमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या वाहनांची अंदाजे किंमत ५५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. गु.र.नं. २०८/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०५(ई), ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम ३/१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             नेवासा खुर्द परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा विटकरी रंगाचा टेम्पो पोलिसांनी पकडला असून, वाहन चालक घटनास्थळापासून पळून गेला. टेम्पो क्रमांक MH-12 SC-7921 असून त्यात सुमारे दोन ब्रास वाळू आढळून आली. एकूण ६ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गु.र.नं. ६७५/२०२५ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्रीप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. येडा चौकात साईनाथ घनवट याच्याकडून ९,३२५ रुपयांची आणि हॉटेल महेश येथून नवनाथ कुटे याच्याकडून ७,३६५ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. या दोघांविरोधात अनुक्रमे गु.र.नं. ७७३/२०२५ व ७७४/२०२५ नुसार मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
              सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी शिरीष वमने (शिर्डी), सुनिल पाटील (शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईसाठी संतोष खाडे यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ आणि त्यांचे विशेष पथक शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, दीपक जाधव, विजय ढाकणे, जालिंदर दहिफळे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली. पोलीस प्रशासनाकडून पुढेही अशाच कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी दिलेली माहिती👇👇
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!