google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना पहावी लागणार निकालाची वाट

6 मे रोजी राज्यातील शाळांचा निकाल; शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक

                                    स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्याथ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेल्या असून दरवर्षीप्रमाणे एक मे रोजी घोषित होणारा शालेय निकाल यावर्षी सहा मे रोजी घोषित करण्यात यावा, असे परिपत्रक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. त्यामुळे एकंदरीत शालेय विद्यार्थ्यांना निकालाची वाट पहावी लागणार आहे
             शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन सालाबादप्रमाणे साजरा करण्यात यावा. राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या स्मृती शताब्दीवर्षपूर्ततेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 6 मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिन साजरा करुन शाळांचा शैक्षणिक वर्ष सन 2022-23 चा निकाल जाहीर करावा. विद्यार्थी / पालकांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत आवश्यकतेप्रमाणे उपक्रम / कार्यक्रमांचे आयोजन करावे. शासन परिपत्रक आणि संचालनालयाचे दिलेल्या सूचनांनुसार शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
             राज्याचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी या सूचना सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देण्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!