
स्वराज न्यूज नेटवर्क
ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना न्युमोनिया झाल्यानंतर फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
व्हेटिकनकडून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. इस्टर संडेचं सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोप पदाची जबाबदारी स्वीकारली होती. कॅथोलिक पंथात सर्वात मोठे पद पोप हे मानले जाते. ते ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे धर्मगुरू मानले जातात. जगातला सर्वात लहान देश असणाऱ्या व्हॅटिकन सिटीतून पोप राज्यकारभार चालवतात. पोप हेच व्हॅटिकन सिटीचे राष्ट्राध्यक्ष मानले जातात. जगभरातील १.२ अब्जापेक्षा जास्त कॅथोलिक ख्रिश्चनांचे ते सर्वोच्च अध्यात्मिक गुरू असतात.
600 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पोपचा राजीनामा
पोप हे पद आजीवन असतं. मात्र २०१३ मध्ये फ्रान्सिस यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच फ्रान्सिस यांची पोप पदी निवड झाली होती. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच पोपने पद सोडल्याची घटना घडली होती.