ब्रेकिंग
नेवाशात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला
तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; ४४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुले

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुक्यातील ११४ पैकी ८८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत बुधवार (दि. २३) सकाळी ११ वा. तहसील कार्यालयात काढण्यात आली. खुल्या प्रवर्गासाठी ४४, ओबीसीकरिता २४, अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी १३, अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी ७ आरक्षण सोडत निघाल्याचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी सांगितले.
विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ७ वर्षांच्या आशिष कांबळे या मुलाच्या हस्ते आरक्षण चिठ्या काढण्यात आल्या. या वेळी नायब तहसीलदार किशोर सानप, चांगदेव बोरुडे, अतुल भांगे आदी उपस्थित होते.
खुला प्रवर्ग : बाभूळखेडा, बहिरवाडी, बकुपिंपळगाव, बेलपिंपळगाव, चांदा, देवगाव, देवसडे, गळनिंब, गेवराई, हंडीनिमगाव, हिंगोणी, मक्तापूर, जैऊर हैबती, कौठा, खरवंडी, लोहगाव, माका, माळीचिंचोरा, म्हाळस पिंपळगाव, मोरया चिंचोरे, नजीक चिंचोली, पाचेगाव, पाचुंदा, पानसवाडी, पिचडगाव, प्रवरासंगम, रांजणगाव, सलाबतपूर, शिंगवेतुकाई, शिरेगाव, सौंदाळा, सुलतानपूर, सुरेशनगर, तेलकुडगाव, उस्थळ दुमाला, वडाळा बहिरोबा, वाकडी, वांजोळी, वरखेड, निपाणी निमगाव, तरवडी, टोका, पिंप्रीशहाली, खेडले परमानंद.
अनुसूचित जाती : बऱ्हाणपूर, शहापूर, गोणेगाव, सुरेगाव-गंगा, लांडेवाडी, रामडोह, शिंगणापूर, अंमळनेर, खुणेगाव, बेल्हेकरवाडी, मांडेगव्हाण, उस्थळ खालसा, मुकिंदपूर.
अनुसूचित जमाती (९ ग्रामपंचायत) : वाटापूर, पानेगाव, कारेगाव, निंभारी, गोंडेगाव, जळके बुद्रुक, जैनपूर.
इतर मागास प्रवर्ग : भालगाव, भेंडा बुद्रुक, देडगाव, दिघी, फत्तेपूर, गोधेगाव, कांगोणी, करजगाव, खडका, कुकाणा, मंगळापूर, नारायणवाडी, रस्तापूर, घोगरगाव, चिंचबन, खुपटी, नवीन चांदगाव, भानसहिवरे, नागापूर, मुरमे, जळके खुर्द, सोनई, भेंडा खुर्द, पुनतगाव.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचे आरक्षण सोडत झाल्याने आता स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.